‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

सीबीएसई पॅटर्नच्या ‘अनुभूती विद्यानिकेतन’ चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव दि. ८ प्रतिनिधी – ‘मुलांचा स्क्रिन टाईम, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात चांगली पिढी, समाज घडवितांना पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती बालनिकेतन आणि आता अनुभूती विद्यानिकेतन जी सीबीएसई (CBSE) पॅटर्नमध्ये सुरू झाली. जी विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता बौद्धिक, सृजनशील, जीवन कौशल्य आणि शारीरिक आरोग्य या सर्व पैलूंचा सर्वांगीण विकास घडविण्यास कठिबद्ध राहिल यातून भारताची दिशादर्शक पिढी घडेल; असे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.
‘अनुभूती विद्यानिकेतन’ च्या उद्घाटनाप्रसंगी पालकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मनोज परमार, शोभना जैन, अंबिका जैन, अर्थम जैन व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सुरूवातीला सरस्वती चे विधिवत पूजन झाले. त्यानंतर संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. ब्रह्मवृदांनी शांती मंत्र तर स्कूलच्या शिक्षिकांनी प्रार्थना म्हटली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गणवेश व पूस्तके वाटप करण्यात आलीत.
शिक्षणपद्धती; बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासावर भर देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी विश्वसनीय वाहतूक ने-आण सुविधा, समर्पित शिक्षण प्रणालीसह अनुभवी शिक्षकवृंद. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नैसर्गरम्य वातावरण अशी वैशिष्ट्ये अनूभूती विद्या निकेतन ची अधोरेखित करणारी आहे.