मुंबई-प्रतिनिधी | महिंद्रा कंपनीच्या थारला टक्कर देण्यासाठी मारूती सुझुकी कंपनी आपल्या जिमनी या मॉडेलचे नवीन व्हेरियंट सादर करणार असून यामुळे या सेगमेंट मधील स्पर्धा तीव्र होणार असल्याचे मानले जात आहे.

SUV प्रेमींना आकर्षित करणारी Suzuki Jimny आता नव्या रूपात येण्यासाठी सज्ज झाली आहे. 2025 मध्ये ही ऑफ-रोड SUV अधिक सुरक्षित, आधुनिक आणि संभाव्य हायब्रिड इंजिनसह बाजारात येणार आहे. भारतात लोकप्रिय असलेल्या महिंद्र थारला टक्कर देण्याच्या तयारीत Suzuki Jimny चे हे फेसलिफ्ट व्हर्जन ऑगस्ट 2025 मध्ये सादर होणार आहे.
Suzuki Jimny चा पारंपरिक बॉक्सी आणि रेट्रो लुक कायम ठेवण्यात येणार असून, काही सौंदर्यात्मक बदल वगळता संपूर्ण डिझाईन तसंच राहणार आहे. ही कॉम्पॅक्ट SUV यापूर्वीच आपल्या रॉ लुक आणि दमदार ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जात होती, आणि आता ती तितक्याच आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज होणार आहे.
2025 Jimny मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणारा अद्ययावत ADAS (Advanced Driver Assistance System) सेटअप. यामध्ये Suzuki Safety Support System अंतर्गत खालील प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश असेल:
ड्युअल कॅमेरा आधारित ADAS टेक्नोलॉजी
ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम (AEB)
एडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (फक्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी)
रिव्हर्स ब्रेकिंग सपोर्ट आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट
या सुधारणांमुळे Jimny आता युरोप, ऑस्ट्रेलिया आणि यूकेसारख्या कडक सेफ्टी नॉर्म्स असलेल्या देशांतही विक्रीसाठी पात्र ठरणार आहे.
हायब्रिड इंजिनबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, युरो 6/7 उत्सर्जन नियमांमुळे युरोपसाठी हायब्रिड पर्याय Suzuki तयार करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे इंजिन लॉन्चच्या वेळी उपलब्ध असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र चर्चांना जोर मिळाला आहे.
Jimny चे तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फेसलिफ्ट व्हर्जन उपलब्ध होणार आहे:
Jimny 3-डोअर (जपानी व्हर्जन) – 0.6L टर्बो पेट्रोल इंजिन
Jimny Sierra 3-डोअर (जागतिक व्हर्जन) – 1.5L नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल
Jimny Nomade 5-डोअर (भारत निर्मित) – जी भारतातून इतर देशांमध्ये निर्यात केली जात आहे
या तिन्ही व्हेरिएंटमध्ये नवे सेफ्टी फिचर्स स्टँडर्ड असतील.
Jimny चे हे नविन रूप Mahindra Thar ला सरळ आणि तीव्र स्पर्धा देण्यास सज्ज आहे. Thar जरी आकाराने मोठी आणि पॉवरफुल असली तरी Jimny ची कॉम्पॅक्ट रचना, हलकं वजन आणि अचूक ऑफ-रोड क्षमतेमुळे ती सिटी SUV आणि अॅडव्हेंचर SUV या दोन्ही प्रकारांमध्ये योग्य पर्याय ठरते.
जर Jimny मध्ये हायब्रिड इंजिनचा पर्याय आला, तर ती इंधन कार्यक्षमतेच्या बाबतीतही थारवर मात करू शकेल. परिणामी, 2025 Suzuki Jimny ही SUV केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा प्रभाव पाडण्याची क्षमता बाळगून आहे.
2025 मध्ये येणारी नवीन Suzuki Jimny ही सुरक्षितता, टेक्नोलॉजी आणि संभाव्य हायब्रिड पर्यायामुळे एक अत्याधुनिक SUV ठरेल. ऑगस्ट महिन्यात तिच्या अधिकृत लॉन्चनंतर SUV सेगमेंटमध्ये नवा ट्रेंड सुरु होण्याची शक्यता आहे.