जीपचे नवे कंपास आणि मेरिडियन ट्रेल एडिशन लॉन्च

मुंबई- प्रतिनिधी | जीप इंडिया ने आपल्या लोकप्रिय SUV कंपास आणि मेरिडियनचे नवीन ट्रेल एडिशन मॉडेल्स भारतीय बाजारात सादर केले आहेत. अधिक आकर्षक स्टाइलिंग आणि दमदार फीचर्ससह या नव्या व्हेरिएंट्सची किंमत आणि वैशिष्ट्ये सध्या SUV प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

नव्या जीप कंपास ट्रेल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 25.41 लाख ते 27.41 लाख रुपयांपर्यंत असून मेरिडियन ट्रेल एडिशनची किंमत 31.27 लाख ते 37.27 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ग्राहकांसाठी कंपनीने जीप ट्रस्ट प्रोग्राम अंतर्गत विशेष सवलतीही उपलब्ध करून दिल्या आहेत.

कंपास ट्रेल एडिशनमध्ये बोनट आणि बाजूवर खास डेकल्स लावण्यात आले आहेत. ग्रिलला मॅट ब्लॅक अॅक्सेंट आणि ग्रिल रिंग्जवर न्यूट्रल ग्रे एलिमेंट्स देण्यात आले आहेत. DLO, बॅकलाइट मोल्डिंग, रूफ रेल इन्सर्ट्स, ORVMs, जीप व कंपास बॅज, रियर लोअर फेशिया अॅप्लिक आणि रेड अॅक्सेंटेड फ्रंट लोअर फेशिया यामुळे SUV ला रग्ड आणि प्रीमियम लुक मिळतो.

18-इंचांचे ड्युअल-टोन अॅलॉय व्हील्स आणि ग्रॅनाइट मेटॅलिक सॅटिन ग्लॉस फिनिश यामुळे SUV चे रोड प्रेझेन्स आणखी उठून दिसते.

या नवीन एडिशनच्या इंटीरियरमध्ये ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्रीसोबत इग्नाइट रेड मिड-बोल्स्टर ट्रेसर आणि रेड कॉन्ट्रास्ट स्टिचिंग दिले आहे. स्टीयरिंग व्हील, गियर बूट आणि सीट्सवर या स्टिचिंगमुळे केबिनला स्पोर्टी टच मिळतो. अनोखा डार्क कॅमोफ्लेज ग्राफिक आणि ऑल-वेदर फ्लोअर मॅट्स यामुळे व्यावहारिकतेला नवीन परिमाण मिळते.

मेरिडियन ट्रेल एडिशनमध्ये बोनटवर सिग्नेचर डेकल, ट्रेल एडिशन बॅजिंग आणि हाय-ग्लॉस ब्लॅक रूफ देण्यात आले आहे. ग्रिल, हेडलॅम्प सराउंड, रूफ रेल इन्सर्ट्स, रियर फेसिया, साइड क्लॅडिंगवर न्यूट्रल ग्रे अॅक्सेंट दिले आहेत. फॉग लॅम्प सराउंड, DLO, रियर लाइटबार मोल्डिंग, ORVMs आणि पियानो ब्लॅक हायलाइट्स SUV ला रग्ड आणि प्रीमियम अपील देतात.

इंटीरियरमध्ये रूबी रेड अॅक्सेंटसह हाय-कॉन्ट्रास्ट ब्लॅक विनाइल इंटीरियर, कॅमोफ्लेज थीम असलेले एप्लिके आणि पियानो ब्लॅक सेंटर कन्सोल दिले आहेत. रग्ड स्किड प्लेट्स, स्कफ प्लेट्स आणि ब्लॅक-आउट ORVMs यामुळे SUV चा ऑफ-रोड लुक पूर्णत्वास जातो.

स्टेलंटिस इंडिया ऑटोमोटिव्ह ब्रँडचे डायरेक्टर कुमार प्रियेश म्हणाले, “ट्रेल एडिशन आमच्या जीप ब्रँडच्या स्वातंत्र्य, साहस आणि विश्वासार्हतेच्या मूल्यांना अधोरेखित करतो. रोडवर किंवा ऑफ-रोडवर एक वेगळा स्वामित्व अनुभव देणे हे आमचे ध्येय आहे.”