रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया ! म्हणाल्या…

पुणे-प्रतिनिधी । पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर, त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला शाखेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

तब्बल २४ तासांनी रोहिणी खडसे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्या म्हणाल्या की, कुठलाही थेट आरोप किंवा स्पष्टीकरण न देता, त्यांनी कायद्यावर-पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवत संयमी भूमिका घेतली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांनी लिहिले आहे: “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल!”

या मोजक्या पण स्पष्ट पोस्टने अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, रोहिणी खडसे यांनी शांतता राखत कायद्यावर विश्वास व्यक्त केला आहे.