Suspect from MP and Muktai Nagar caught with village knife and two live cartridges वरणगाव (5 सप्टेंबर 2025) : दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी शस्त्र व काडतूसांसह आलेल्या आरोपींना जळगाव गुन्हे शाखेनेव रणगाव येथील फुलगाव फाट्याजवळून अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता करण्यात आली. चरणसिंग उखा चव्हाण (36, रा.चौंडी, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) व पंकज रतनसिंग चव्हाण (25, रा.मोरझिरा, मुक्ताईनगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला शस्त्र तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. फुलगाव शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक 53 खाली आरोपी दुचाकी (एम.पी.68 झेड.सी.3357) वरून येताच त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 40 हजार रुपयांच्या गावठी पिस्तूलासह चार हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस तसेच 55 हजारांची दुचाकी तसेच 15 हजारांचे दोन मोबाईल मिळून उएक लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कृष्णा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रवींद्र चौधरी, सचिन घुगे, चालक हवालदार भरत पाटील आदींच्या पथकाने केली.