जि.प.मध्ये ओळखपत्र लावणे बंधनकारक; पालन न केल्यास कारवाईचा इशारा

जि.प.मध्ये ओळखपत्र लावणे बंधनकारक; पालन न केल्यास कारवाईचा इशारा
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये कामासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, अनेकदा कोण कर्मचारी आणि कोण अधिकारी हे नागरिकांना समजत नाही. यामुळे गैरसोयीच्या घटना घडू शकतात.

ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र (आयडेंटिटी कार्ड) दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश लिखित स्वरुपात देण्यात आले असून, याची अंमलबजावणी न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हाभरातून नागरिक विविध कामांसाठी येत असतात. अशावेळी विभागात अधिकारी व कर्मचारी कोण, हे ओळखपत्राशिवाय ओळखणे कठीण जाते. त्यामुळे सर्वांनी ओळखपत्र सतत परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले असून, तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.