मुंबई- (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आज सकाळी येताच राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ शांत होत नाही तोच जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी ट्विट करून राजीनामा झाल्याचे नसल्याचे सांगितले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने आज सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. तर त्यांच्या जागी शशिकांत शिंदे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त हा खोडसाळपणा असून त्यांनी राजीनामा दिलाच नसल्याचे सांगितल्याने हा संभ्रम अजून वाढीस लागला आहे.