राज्य मंत्रीमंडळात लवकरच होणार फेरबदल !

मुंबई- राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लवकरच मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मंत्री संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. तसेच मुंबईतील सावली बारमुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील चर्चेत आहेत. यामंत्र्यांबाबत विविध तक्रारी देखील दाखल होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल, अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

कारवाई न केल्यास काहीही केलं तर चालतं, अशी भीती देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील अशी भावना देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली. यामुळे येत्या काही दिवसात काही मंत्र्यांना नारळ मिळू शकते.