सांगली – ‘ज्यांना सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जायचे आहे, त्यांनी आताच जावे. पण ऐन निवडणुकीच्या वेळी जाऊन कोंडी करायचा प्रयत्न करू नका, अन्यथा मी मोकळाच आहे, बसून तुमचा कार्यक्रम लावीन, अशा कठोर शब्दांत त्यांनी स्वकीयांना इशारा दिला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, ज्यांना थांबायचे आहे ते थांबतील, बाकीचे जातील. पण ‘थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय, असा थेट इशाराच पक्ष फोडणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना दिला आहे. पक्षातील अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की, ज्यांना जायचे आहे त्यांनी आताच पक्ष सोडून जावे. महापालिका निवडणुकीच्यावेळी जर कोणी पक्ष सोडला, तर त्यांचा कार्यक्रम करू.
जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ज्या चुका केल्या त्या मान्य आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यातून महाराष्ट्रातील लोकांना सांगितले आहे. कोण कुठल्या खात्याचा मंत्री याला फार महत्त्व नसते. पण लोकांना आक्षेपार्ह वाटेल अशा गोष्टी माननीय मुख्यमंत्री यांनी करणे म्हणजे याचा अर्थ त्यांना या गोष्टी मान्य केल्या आहेत, असे म्हणत त्यांनी महायुतीच्या सरकारवर टीका केली.